मोदींना अमेरिकेत प्रवेश दिलाच कसा? नेटकऱ्यांनी प्रश्न विचारला

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि इकडे सोशल मीडियात त्यांच्या दौऱ्याविषयी सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरु झाली. नरेंद्र मोदी यांनी कोवॅक्सीन ही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे आणि या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही. त्यामुळे मोदींना अमेरिकेत कसा प्रवेश दिला, असा प्रश्न नेटकऱ्यांनी ट्विटरवरून विचारला आहे.

मोदींचे खोटे बोलले का?

अरमान नावाच्या व्यक्तीने ट्विट करून म्हटले आहे की, मोदींनी खरेच कोवॅक्सीन घेतली का? अमेरिका फक्त त्यांनाच प्रवेश देते ज्यांनी जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिलेली लस घेतली आहे. मोदी हे अमेरिकेत कोव्हिशील्ड अथवा फायझर लस घेतल्याशिवाय प्रवास करू शकत नाही. मोदी पुन्हा भारताशी खोटे बोलले आहेत, असे म्हटले आहे.

तर सुमन शर्मा यांनी ‘सर तुम्हाला विलगीकरणात रहावे लागणार आहे, कारण तुम्ही अमेरिकेने परवानगी न दिलेली कोवॅक्सीन लस घेतली आहे.’

सुमित मझुमदार म्हणाले की, नरेंद्र मोदी यां अमेरिकेत उतरायला कशी परवानगी मिळाली? कारण कोवॅक्सीन लसीला परवानगी नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण झालेले नाही, असेच गृहीत धरले जाणार का? किंवा त्यांना त्यांच्यासाठी विलगीकरण/व्हिसा रद्द नाकारणे हे केवळ भारतातील करदात्या नागरिकांना लागू आहेत आणि मोदींना नाही?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here