केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्वीटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, ” पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो. मोदींनी भारत-प्रथम दृष्टीकोनाने आणि गरिबांच्या कल्याणासाठीच्या संकल्पाने अशक्य कामे शक्य करून दाखवली आहेत. गरीबांचे कल्याण, सुशासन, विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि ऐतिहासिक सुधारणांसाठी एकाच वेळी आणि सतत प्रयत्न करून मोदींनी भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा आपला संकल्प पूर्ण केला आहे. त्यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या अतूट विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे.
( हेही वाचा : प्रबोधनकार हिंदू धर्माभिमानी होते; आजोबांचे विचार वाचा म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर)
एक सुरक्षित, सशक्त व आत्मनिर्भर नए भारत के निर्माता @narendramodi जी का जीवन सेवा और समर्पण का प्रतीक है।
आजादी के बाद पहली बार करोड़ों गरीबों को उनका अधिकार देकर मोदी जी ने उनमें आशा और विश्वास का भाव जगाया है।
आज देश का हर वर्ग चट्टान की तरह मोदी जी के साथ खड़ा है।— Amit Shah (@AmitShah) September 17, 2022
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोट्यवधी गरीबांना त्यांचे हक्क देऊन मोदींनी त्यांच्यात आशा आणि विश्वासाची भावना निर्माण केली आहे, आज समाजातील प्रत्येक घटक भक्कमपणे मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि त्याचा प्रचार करून, मोदींनी देशाला त्याच्या मुळाशी जोडत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले आहे. आजचा नवा भारत, मोदींच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे, एक जागतिक नेते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे, त्यांचा जगभरात आदर होत आहे.” असे सांगत अमित शहा यांनी देशाच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community