पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी ६ सप्टेंबर रोजी निघणार आहेत. ही परिषद इंडोनेशिया येथे होणार आहे. पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ (भारताचे पंतप्रधान) असा करण्यात आला आहे. (Prime Minister of Bharat) ५ सप्टेंबरच्या रात्री भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली.ASEAN-India परिषदेत सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. ASEAN (दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) संघटनेचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहेत.
(हेही वाचा – Pune Municipality : पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांची 5 महिन्यांतच बदली)
दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या बदलामुळे विरोधकांनी त्याला राजकीय रूप दिले होते. ‘प्रेसिडंट ऑफ भारत’ केल्यानंतर आता ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. देशप्रेमींच्या दृष्टीने हे बदल सुखावह असल्याचे सामाजिक माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांतून दिसून येत आहे. (Prime Minister of Bharat)
१८ सप्टेंबरपासून केंद्र सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असले तरी, त्यातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहेत. त्यातच संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधानदुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Prime Minister of Bharat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community