देशाचे पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच! भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

93

देशातील आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी केले आहे. बिहारमध्ये भाजप कार्यकारणीची बैठक झाली. यामध्ये अरूण सिंह असाही म्हणाले की, बिहारमध्ये जनता दल युनायटेडसह निवडणूक लढवली जाईल. भाजप नेहमी युतीचा धर्म पाळते. आपण सोबतच निवडणूक लढू, २०२४ किंवा २०२५…त्यांचे हे वक्तव्य आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात असून देशभरात याच वक्तव्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – रेशन कार्ड धारकांना सरकारकडून दिलासा! आता FREE मिळणार LPG सिलिंडर)

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, याची उत्सुकता देशाला लागलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरूण सिंह म्हणाले, जनता दल युनायडेसह आमची नाराजी नाही. बिहारमधील जेडीयूसह पुढील निवडणुका आम्ही लढू, तसेच नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील आणि त्यांच्याच नेतृत्वात २०२४ मधील निवडणुका लढवल्या जातील. अरूण सिंह यांच्या या वक्तव्याला भाजपचे फायर ब्रँड नेते गिरीराज सिंह यांनी देखील दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत – नड्डा

याच बैठकीदरम्यान, जेपी नड्डा यांनी देखील खळबळजनक वक्तव्य केले. भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. यासह राज्यात शिवसेनेचा अंत होत असून देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही, जो भाजपला पराभूत करू शकेल. बिहार येथील १६ जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.