पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत हृदयनाथ मंगेशकर यांच्याविषयी जे सांगितले, त्यावरून त्यांना नमस्कार आहे. माझ्या आयुष्यात मला जेव्हापासून कळलं तेव्हापासून सांगतो की, ‘ने मजसी ने…’ या गीताला आकाशवाणीनेच मोठे केले. हृदयनाथ मंगेशकर यांना काढले असेल, तर ते गाणे आकाशवाणीत कशाला वाजवतील?, असा सवाल करत रेकॉर्डमध्ये असे काही नाही, पंतप्रधान मोदी हे खोटे बोलले, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
कितीही प्रयत्न करा. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. कुणाला गुडघे टेकायचे असतील, कुणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल, महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर कोरोना म्हणाला. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रामध्ये प्रेतं नाही पडली. आणि महाराष्ट्रात सुपर स्प्रेडर…? हे योग्य नाही.
– संजय राऊत, शिवसेना नेते
मोदी काय म्हणाले होते?
लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेतला. त्यांच्यावर केलेली कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असल्याचे म्हणत मोदी म्हणाले की, लता मंगेशकरांच्या निधनाने देश दुःखी झाला, पण लता मंगेशकर यांचे कुटुंब हे गोव्यातील होते. त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला, हे जाणून घ्या. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले होते, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितले. सावरकरांनी हृदयनाथ यांना सांगितले होते, की माझी कविता सादर करून तुला जेलमध्ये जायचेय का…तेव्हा हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेचा चाल देत सादर केले होते.. यानंतर दहाच दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं, असा दावा मोदींनी केला.
(हेही वाचा देशमुखांच्या विरोधात वाझेला बनायचे माफीचा साक्षीदार! काय होणार देशमुखांचे?)
Join Our WhatsApp Community