-
वंदना बर्वे
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी खेळलेला जातीनिहाय जनगणनेचा डाव पाचही राज्यांतील मतदारांनी हाणून पाडला आहे. मोदी यांची जादू देशभरात अजूनही कायम आहे, याची जाणीव एग्झिट पोलच्या आकडेवारीने करून दिली आहे. (Assembly Elections)
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोरम या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच विविध संस्थांनी केलेल्या एग्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आहे. यात भाजपला चांगले यश मिळत असल्याचे दिसून आल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या अंगणात आनंद मावेनासा झाला आहे. (Assembly Elections)
सर्वात महत्वाचा मुद्या असा की, भारतीय जनता पक्षाने पाचही राज्यांतील निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढविली होती. अशात, एग्झिट पोलमध्ये मध्यप्रदेशात भाजपा पुन्हा सरकार बनविणार आणि राजस्थानमध्ये तख्तापलट होऊन भाजपची सत्ता येणार असल्याचे भाकित करण्यात आले आहे. हे आकडे खरे ठरले तर नरेंद्र मोदी यांची जादू अजूनही कायम आहे, असेच म्हणावे लागेल. (Assembly Elections)
याशिवाय, पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांची रणनिती यशस्वी ठरली असेही म्हणावे लागेल. भाजपने मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांना मैदानात उतरविले होते. ही मोदी आणि शहा यांचीच कल्पना होती, हे येथे उल्लेखनीय. मध्यप्रदेशात सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. याउलट, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या कामकाजावर जनता खुश होती असेच म्हणावे लागेल. (Assembly Elections)
(हेही वाचा – Football Manipulation in India? आयलीग फुटबॉल सामन्यांत मॅच फिक्सिंग? )
भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षांनी देशभरात जातीनिहाय जनगणनेचा मुद्या रेटून लावला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील जातीनिहाय जनगणेनची आकडेवारी सुध्दा जाहीर केली होती. यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाच मुद्या पाचही राज्यांत रेटून लावला होता. (Assembly Elections)
मात्र, कॉंग्रेसचा हा डाव फसला असे एग्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येते. कारण, २३० सदस्यांच्या मध्यप्रदेशात एक तृतियांश जागांवर ओबीसी मतदारांचे प्रभुत्व आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली तर विरोधी पक्षांना पंतप्रधान मोदी यांना घेरण्यासाठी नवीन मुद्याचा शोध घ्यावा लागेल, हे येथे उल्लेखनीय. (Assembly Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community