ऋजुता लुकतुके
गुगल आणि अल्पाबेट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Narendra Modi meets Sundar Pichai) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची बैठक सकारात्मक आणि चर्चा पुढे नेणारी होती, अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. या ऑनलाईन बैठकीसाठी त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले.
दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली यावर आता उलटसुलट बोललं जातंय. पण, अर्थातच, भारताचा भर तंत्रज्ञान (Narendra Modi meets Sundar Pichai) क्षेत्रातील भारताचं योगदान वाढावं याकडे होता. भारताने एचपी कंपनीच्या मदतीने देशात गुगल क्रोम या लॅपटॉपचं उत्पादन सुरू करण्याची तयारीही दाखवली आहे.
तसंच गुगलने अलीकडे १०० भाषांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. यात काही भारतीय भाषाही आहेत. या सेवा विस्ताराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सेवाही प्रादेशिक भाषांमध्ये (Narendra Modi meets Sundar Pichai) उपलब्ध कराव्यात अशी विनंती मोदींनी गुगलकडे केली आहे.
(हेही वाचा – Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन इस्रायलला भेट देणार!)
या बैठकीनंतर लगेचच सुंदर पिचाई (Narendra Modi meets Sundar Pichai) यांनी एक ट्विट केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या भन्नाट ऑनलाईन बैठकीसाठी आभार. गुगल भारताबरोबरच्या सहकार्यासाठी कटीबद्ध आहे. आणि इथून पुढे कृत्रिम बुद्धिमत्ता, काही महत्त्वाचे प्रकल्प या बाबतीत सहकार्य अजूनही सुरूच राहील,’ असं पिचाई यांनी या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ट्विटला लगेच उत्तर दिलं आहे.
Thank you PM @narendramodi for the terrific meeting today to discuss Google’s ongoing commitment to India, and how we are expanding our operations, leveraging AI, and increasing our partnerships.
— Sundar Pichai (@sundarpichai) October 16, 2023
चर्चेच्या केंद्रस्थानी गुगलचा आणखी एक निर्णयही होता. गुगल कंपनी (Narendra Modi meets Sundar Pichai) आपली जागतिक फिनटेक कंपनी गुजरातमध्ये अहमदाबाद इथं उभारण्यासाठी इच्छुक आहे. याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज आहे. शिवाय सुंदर पिचाई यांनी देशातील युपीआय वापराचं कौतुक करतानाच गुगल पेचा युपीआयमधील हिस्सा वाढवण्याची इच्छाही बोलून दाखवली.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi meets Sundar Pichai) यांनी सुंदर पिचाई यांना डिसेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिखर परिषदेचं आमंत्रणही दिलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community