पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, (१४ मे) तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी एनडीएमध्ये समाविष्ट सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. १२ राज्यांचे मुख्यमंत्री, २० केंद्रीय मंत्री, यूपी सरकारचे मंत्री आणि अनेक खासदार-आमदार सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी दशाश्वमेध घाटावर पोहोचून प्रार्थना केली. याविषयीची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’हँडलद्वारे दिली आहे. येथे घाटावर स्नान करून त्यांचे घाटावर पूजा करण्याचे नियोजन आहे. घाटावर एक तास थांबून क्रूझमध्ये बसून नमो ते घाटावर जातील. येथून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: कर्णबधीर, दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी हेल्पलाइन, व्हिडीओ कॉलची सुविधा; कसा कराल वापर? )
सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
#WATCH : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील दशस्वमेध घाटावर केली प्रार्थना
.
.
.#viral #Varanasi #narendramodiji #ModiRoadShow #MumbaiRains #Phase4 #LokSabaElections2024 #WWERaw #GucciCruise25 #Hindusthanpost #MarathiNews pic.twitter.com/GT1jtE4c4J— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 14, 2024
रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे प्रबोधनपर परिषदेला संबोधित केल्यानंतर ते मालदहिया येथील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. नामांकनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी BHU ते काशी विश्वनाथ मंदिर असा ५ किलोमीटर लांबीचा रोड शो केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community