Narendra Modi: गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला, पंतप्रधानांची जहाल शब्दांत टीका

पाचव्या टप्प्यानंतर २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

161
Narendra Modi: गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला, पंतप्रधानांची जहाल शब्दांत टीका
Narendra Modi: गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला, पंतप्रधानांची जहाल शब्दांत टीका

गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी राजकीय फायद्यासाठी वेळोवेळी राज्यघटनेत बदल करून भारतीय संविधानाचा अपमान केला, अशी जहाल टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. माझ्यासाठी राज्यघटना राज्यकारभाराचा सर्वात मोठा ग्रंथ आहे. भाजपा सत्तेत आल्यास संविधानात कुठलाही बदल केला जाणार नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. ते ओडिसातील पुरी येथील जाहीर सभेत बोलत होते. (Narendra Modi)

देशभरात सोमवारी, २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. पाचव्या टप्प्यानंतर २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये ओडिसातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओडिसाच्या पुरी येथे रोड शो केला.

(हेही वाचा  – Parliament Security: संसदेची सुरक्षा आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे, ३ हजारांहून अधिक जवान सज्ज; कारण काय ?)

त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर जहरी टीका केली. काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी वेळोवेळी संविधानात बदल केला आहे, असा आरोप मोदींनी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबातील ४ सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेचा वापर केल्याचं मोदींनी म्हटलं.

“गांधी घराणे राज्यघटनेशी खेळणारे पहिले कुटुंब असून पंडित नेहरू यांनी पहिली घटनादुरुस्ती आणली. त्यानंतर त्यांच्या मुलीने (इंदिरा गांधी) आपले पद वाचवण्यासाठी ‘आणीबाणी’ लादली. इंदिरा गांधी यांनी राज्यघटना बदलून माध्यमांवर निर्बंध आणले”, असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला.

राज्यकारभाराचा सर्वात मोठा ग्रंथ
२०१३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या अध्यादेशाची प्रत फाडल्याबद्दल मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी अध्यादेशाची प्रत फाडल्यामुळे मंत्रिमंडळाने निर्णय मागे घेतला होता, अशी आठवणही मोदींनी करून दिली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सन्माननीय सदस्यांबद्दल मला नितांत आदर आहे. ज्यांनी राज्यघटना तयार केली, त्यांनी चहा विकणाऱ्याला पंतप्रधान होण्याची संधी दिली. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. माझ्यासाठी राज्यघटना हा राज्यकारभाराचा सर्वात मोठा ग्रंथ आहे”, असंही मोदी म्हणाले.

घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करा
“लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता पुढील टप्प्यात आम्ही ४०० जागा पार करणार आहोत. आजही मी मतदारांना सांगेन की, घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करा”, असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी मतदारांना केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.