जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होतील. ती वेळ दूर नाही, या देशांना लवकरच राज्याचा दर्जा मिळणार, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. शुक्रवारी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील सभेला संबोधित करताना केले. यावेळी तुमची स्वप्ने तुमच्या आमदार आणि मंत्र्यांसोबत शेअर करू शकाल, अशी खात्रीही त्यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)
ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये दशकानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. जेव्हा दहशतवाद, दगडफेक, सीमेपलीकडून गोळीबार असे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यावेळी माता वैष्णोदेवी यात्रा असो की अमरनाथ यात्रा असो, ती सुरक्षितपणे कशी पार पाडावी, याबाबत चिंता होती, असे पंतप्रधान म्हणाले. आज परिस्थिती बदलली आहे. आज येथे विकास होत असून विश्वासही वाढत आहे. इथे प्रत्येक कोपऱ्यात एकच प्रतिध्वनी ऐकू येत आहे. तो म्हणजे, पुन्हा एकदा मोदी सरकार!
(हेही वाचा – Zombie Drug: ‘झॉम्बी ड्रग’ बनवण्यासाठी मृतदेहांची चोरी; ‘या’ देशामध्ये आणीबाणी जाहीर!)
राम मंदिराचा संघर्ष ५०० वर्षे जुना
कॉंग्रेस म्हणते की, राम मंदिर हा भाजपासाठी निवडणुकीचा मुद्दा आहे. राम मंदिरा हा निवडणुकीचा मुद्दा नव्हता, नाही आणि राहणारही नाही. भाजपाचा जन्म होण्यापूर्वीपासून राम मंदिराचा संघर्ष सुरू होता. राम मंदिराचा संघर्ष ५०० वर्षे जुना आहे. तेव्हा निवडणुकांचा मागमूसही नव्हता.
निराशेतून आशेकडे वाटचाल
उपस्थित जनसमुदायाला संबोधित पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मोदी विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरच्या निर्मितीची हमी देत आहे, पण कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीला ते जुने दिवस परत करायचे आहेत. जम्मू-काश्मीरचे जेवढे नुकसान या पक्षांनी केले आहे. तेवढे कोणीही केले नाही तसेच १० वर्षांत जम्मू-काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. रस्ते, पाणी, प्रवास, स्थलांतर हे सगळे आहे, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीरने आपला विचार बदलला आहे. निराशेतून आशेकडे वाटचाल केली आहे. आता येत्या ५ वर्षांत या परिसराला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community