पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, (९ जून) सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी सकाळी ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी गेले. मोदींनी अटल स्मृती स्थळावर जाऊन आदर व्यक्त केला. यानंतर नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर पोहोचून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. (Narendra Modi Oath Ceremony)
#WATCH | Delhi: PM-designate Narendra Modi along with CDS Gen Anil Chauhan, Army Chief Gen Manoj Pande, Indian Navy Chief Admiral Dinesh Tripathi, and VCAS Air Vice Marshal Amar Preet Singh laid wreath at the National War Memorial, ahead of his swearing-in ceremony, to be held… pic.twitter.com/CvjK8PWxqq
— ANI (@ANI) June 9, 2024
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) रविवारी सत्तास्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मोदींना पंतप्रधानपदाची शपथ देतील. या सोहळ्याला अनेक देशांमधील नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
(हेही वाचा – OTT App Buyout : ॲमेझॉन विकत घेणार भारतातील ‘हे’ मनोरंजन ओटीटी ॲप)
Join Our WhatsApp Community