Narendra Modi : ‘देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हरियाणाने हाणून पाडला’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

128
Narendra Modi : 'देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हरियाणाने हाणून पाडला'- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Narendra Modi : 'देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हरियाणाने हाणून पाडला'- पंतप्रधान नरेंद्र मोदी

हरियाणाच्या (Haryana) विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्यामुळे हरियाणात (Haryana) भाजपा सरकारची हॅट्रीक होणार हे निश्चित झाले आहे. हरियाणाच्या ५७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना तसेच जनेतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस दलित, मागास आदिवासींचा नेहमीच द्वेष करते. संविधान बदलण्याचे फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम काँग्रेसने केले. त्यामुळे समाजात जातीचे विष कालवणे, हे काँग्रेसचे काम आहे. मात्र काँग्रसेच्या काळात दलित मागासवर्गीयांचे हाल झाल्याचे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हरियाणाने (Haryana) हाणून पाडला असल्याचे मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.

( हेही वाचा : Shiv Sena : बाळासाहेबांचा विश्वासू सेवेकरी राहिलेल्या व्यक्तीवर शिवसेनेने सोपवली ‘ही’ जबाबदारी

तसेच देशविरोधी राजकारण चालणार नाही , हे हरियाणाने दाखवून दिले. हरियाणात असत्यावर विकास भारी पडला.
मुळात सत्तेविना काँग्रेस अस्वस्थ असते. त्यांना वाटते की, सत्ता हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. अशावेळी देशात अराजकता पसरवत आतंरराष्ट्रीय षडयंत्र रचले जातात, असा हल्लाबोल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर केला.

दरम्यान काँग्रेसकडून देशाच्या सैन्याचा अपप्रचार करते. वेगवेगळ्या संस्थांना बदनाम करणे, शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. तसेच मित्रपक्षाचा घात करत त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्नही काँग्रेस याआधी केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे मित्रपक्षांना फटका बसतो. यामुळे अनेक राज्यात काँग्रेसची सत्ता पुन्हा आलीच नाही. ज्यामुळे काँग्रेस परजीवी पक्ष झाला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधांनानी केला आहे. तसेच हरियाणातील यशाबद्दल हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचे फळ आहे. ज्यामुळे हरियाणात खेळांला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मात्र भारत विकासाच्या मार्गावरून हटणार नाही. हरियाणा विकसित होणार, जम्मू- काश्मीर विकसित होणार, संपूर्ण देशही विकसित होणार. त्यामुळे दशकभरानंतर जम्मू- काश्मीरमध्ये शांततापूर्ण निवडणूका झाल्या. तर दुसरीकडे हरियाणाच्या जनतेने पुन्हा कमाल केली. हरियाणातील शेतकरी देशासोबत उभे राहिले. ज्यामुळे हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुलले. गीतेच्या भूमीवर सत्याचा विजय झालाय, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी हरियाणाच्या विजयावर दिली. तसेच हरियाणाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ला भरभरून प्रतिसाद दिला. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही संविधानाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रत्येक जाती, वर्गाचे मतदान भाजपाला मिळाली. भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे भाजपने जनतेच्या मनात घर केलं आहे. ज्यामुळे भाजप सरकार गरिबांसाठी कटिबद्ध आहे, असे ही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.