मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी… ; पंतप्रधान Narendra Modi यांची अकोल्यात मविआवर टीका

81
मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी... ; पंतप्रधान Narendra Modi यांची अकोल्यात मविआवर टीका
मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी... ; पंतप्रधान Narendra Modi यांची अकोल्यात मविआवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ९ नोव्हेंबरला अकोल्यात होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेतून अकोलाकरांना संबोधित केले. त्यावेळी मोदी (Narendra Modi) म्हणाले की, महायुतीसाठी आशीर्वाद मागायला मी आलोय. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण ९ नोव्हेंबर २०१९ ला सुप्रीम कोर्टाने राममंदिराबाबत (Shree Ram Mandir) निकाल दिला होता. २०१४ ते २०२४ भाजपाला महाराष्ट्रातील लोकांनी भरभरून प्रेम दिलं. कारण महाराष्ट्रातील लोक देशभक्त आहेत. म्हणून भाजपा, महायुती आहे, तर महाराष्ट्राची प्रगती आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तसेच ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना देशाची मोठी ताकद आहे , असे विधान मोदींनी (Narendra Modi)केले.

( हेही वाचा : Accident News: Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला धडक, ३८ प्रवासी…

पुढे ते (Narendra Modi)म्हणाले की, महायुतीच्या जाहिरनाम्यादरम्यान महाविकास आघाडीचा घोटाळ्यांचा जाहिरनामा ही आला आहे. देशात जाणतो की, महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी, बदल्यांचा घोटाळा, अशी टीका ही मोदींनी केली. तसेच महाराष्ट्राच्या सेवेचे माझ्यासाठी वेगळेच सुख आहे. केंद्रात आमची सरकार येऊन पाच महिने झालेत. मात्र या पाच महिन्यात लाखो करोड रुपयांच्या योजना सुरु झाल्या. महाराष्ट्रातील इन्फ्रास्टरचे अनेक प्रकल्प यामध्ये आहेत. वाढवण बंदरासाठी ८० हजार कोटींच्या आसपास निधी देण्यात आला आहे.

त्यामुळे देशातील इतर बंदरांपेक्षा अधिक ताकद ‘वाढवण प्रकल्प’ देशाला देईल. तसेच गरीबांना पक्की घरे देण्याचे कामही आम्ही केलेय. त्यामुळे ज्यांना पक्की घरे मिळाली ते आमच्या मागे उभे राहतील. त्याचबरोबर आजच्या सभेला उपस्थित असणारेच मोदी आहेत, तुम्ही जनतेला वादा द्या, मी तो वादा पूर्ण करेन, असे ही मोदी (Narendra Modi)म्हणाले. तसेच त्यांनी मविआतील घटक पक्षांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.