पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दि. १४ डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या (Indian Constitution) ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर लोकसभेत (Lok Sabha) भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकशाहीच्या मूल्यांच्या रुजवणुकीसाठी भारतीय संविधान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच भारतीय संविधानाची भूमिकेवर त्यांनी जोर दिला. (Parliament Winter Session)
देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ११ महत्त्वपूर्ण संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाबद्दल भाष्य करताना २०४७ पर्यंत भारताला प्रगतीपथावर आणण्यासाठी ११ संकल्प मांडले. पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या भविष्यासाठी संविधानापासून प्रेरित होऊन त्यांनी संसदेत संकल्प सादर केला. (Parliament Winter Session)
– नागरिक असो किंवा सरकार सर्वांनी कर्तव्यांचे पालन करायला हवे.
– प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक समाजातील प्रतिनिधीला लाभ मिळावा, यासाठी सबका साथ सबका विकास हे धोरण सुनिश्चित केले.
– भ्रष्टचाराकडे दुर्लेक्ष केले जाणार नाही. भ्रष्टाचाराला सामाजिक मान्यता मिळू नये यासाठी प्रयत्नशील राहणार.
– देशाचे कायदे, देशातील नियम, देशातील संस्कृती, परंपरांचे पालन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे. तसेच भारतीय संस्कृतीबद्दल गर्व बाळगणे.
– गुलामीची मानसिकता नाहीशी करून देशाच्या वारशाचा अभिमान बाळगा.
– देशातील राजकारणाला घराणेशाहीपासून मुक्त करणे.
– संविधानाचा सन्मान व्हा. तसेच राजकीय फायद्यासाठी संविधानाला हत्यार बनवले जाऊ नये यासाठी प्रयत्न करणार.
– संविधानानुसार ज्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यांच्या हक्क आणि अधिकारावर गदा येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहणार. तसेच धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करणार.
– महिला नेतृत्त्वाच्या विकासाचा आर्दश भारताकडून देशाने घ्यावा यासाठी प्रयत्न करणार.
– राज्याच्या विकासामुळे राष्ट्राचा विकास होतो, हा आमचा विकास मंत्र असावा.
– आमच्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत असावा.