Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल; युपीएच्या भ्रष्ट कामांमुळे लोकांना योजनांचा लाभ मिळतच नव्हता

197
Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल; युपीएच्या भ्रष्ट कामांमुळे लोकांना योजनांचा लाभ मिळतच नव्हता
Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल; युपीएच्या भ्रष्ट कामांमुळे लोकांना योजनांचा लाभ मिळतच नव्हता

एनडीए सरकारच्या काळात देशाचा मोठा विकास झाला आहे, मात्र याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर केला आहे. यवतमाळ येथील भारी शिवारात बुधवारी, (२८ फेब्रुवारी) महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) बोलत होते.

पंतप्रधानांसह एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सभास्थळी उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चे वितरण करण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६व्या हप्त्यापोटी २ हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी ४ हजार, असे एकूण प्रति शेतकरी ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

(हेही वाचा – Hotels Near Ellora Caves: अजिंठा-एलोरा लेण्यांजवळील प्रसिद्ध हॉटेल्स कोणते? वाचा सविस्तर…)

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा. आज जी इंडी आघाडी तयार झाली आहे, यांचंच याआधी केंद्रात सरकार होतं. तेव्हा देशाची स्थिती काय होती ते आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केलं जायचं. परंतु, ते पॅकेज मध्येच लुटलं जात होतं. गावागावांमध्ये गरीब शेतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हतं. परंतु, आजची परिस्थिती बघा. मी एक बटण दाबलं आणि बघता बघता पीएम किसान सन्मा निधीचे २१,००० कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हीच मोदींची गॅरंटी आहे, असे मोदींनी शरद पवारांवर टीका केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.