Narendra Modi : संसद भवन उद्घाटन बहिष्कार नाट्यावर पंतप्रधान मोदी यांनी सोडले मौन; म्हणाले…

गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधानांकडून (Narendra Modi) या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती.

159
Narendra Modi : संसद भवन उद्घाटन बहिष्कार नाट्यावर पंतप्रधान मोदी यांनी सोडले मौन; म्हणाले...

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्षाकडून झालेल्या विरोधावर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आणि देशहिताचे निर्णय घेणाऱ्या संसदेच्या नविन इमारतीचे उद्घाटन २८ मे, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र यावेळी काँग्रेससह २१ पक्षांनी यावर बहिष्कार टाकला होता. तसेच राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याचे निर्देश देणारी याचिका देखील २५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरसाठी अमित शाह यांनी शोधला ‘हा’ रामबाण उपाय)

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

‘‘तीन दिवसांपूर्वी देशाला नवे संसद भवन मिळाले, याचा तुम्हाला अभिमान वाटतो की नाही? देशाची शान वाढल्याचा तुम्हाला आनंद आहे की नाही? मात्र काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी यात राजकारण आणून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला,’’ अशा शब्दांत मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

तसेच नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकणाऱ्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या इमारतीच्या बांधणीसाठी कष्ट घेणाऱ्या ६० हजार मजुरांच्या भावनांचा अपमान केला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी (३१ मे) केली. राजस्थानातील अजमेर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी प्रथमच विरोधकांच्या बहिष्काराबाबत वक्तव्य केले.

हेही पहा – 

गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधानांकडून (Narendra Modi) या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. मात्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू झालेल्या ‘महाजनसंपर्क अभियाना’तील पहिल्याच जाहीर सभेत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.