पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Prime Minister Narendra Modi ) (Narendra Modi) शनिवारी लोकसभेत १७ व्या लोकसभेतील शेवटचं भाषण पार पडलं. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. यानंतर महिन्यभरात १८व्या लोकसभेची निवडणूक होणार आहे.
यावेळी मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला तसेच या काळातील कामांमुळे अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोविडचा काळ, खासदारांचे वेतन कपात आणि नवीन संसदेचे बांधकाम इत्यादींवर चर्चा केली. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत संपूर्ण मानवजातीला या शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. कोण कोणाला वाचवू शकेल की नाही, अशी अवस्थेतून जावे लागले, मात्र देशातील कामकाज थांबवले नाही. ते पुढे म्हणाले की, त्या काळात देशाच्या गरजा लक्षात घेऊन खासदार निधीबाबत प्रस्तावही खासदारांनी मांडला. खासदारांनी त्यांच्या पगाराच्या ३० टक्के रक्कम समाजाला दान केली.
खासदारांच्या वेतनावर भाष्य…
लोकसभेत खासदारांच्या वेतनाबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, खासदारांना इतका पगार मिळतो आणि कॅन्टीनमध्ये स्वस्त जेवण मिळते असे आपण सर्वजण ऐकतो, मात्र कॅन्टीनमध्ये सर्वांसाठी एकसारखे दर असतील आणि खासदारांनी याला कधीही विरोध केला नाही.
देशाला नवीन संसद भवन मिळाले
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत अनेक सुधारणा झाल्या आहेत. हे सर्व गेमचेंजर्स आहेत, 21 व्या शतकातील भारताचा भक्कम पाया यामुळे दिसून येतो. देश मोठ्या बदलातून जात आहे. यामध्ये सभागृहाच्या सर्व सहकाऱ्यांनी आपला सहभाग दिला आहे, ज्या गोष्टींसाठी आपल्या अनेक पिढ्या वाट पाहत असत, असे काम गेल्या 5 वर्षात झाले आहे. अनेक पिढ्यांनी राज्यघटनेचे स्वप्न पाहिले होते. पण प्रत्येक क्षणी राज्यघटनेत एक पोकळी निर्माण झाली, पण या सभागृहाने कलम 370 रद्द केले. मला विश्वास आहे की ज्या महान व्यक्तींनी राज्यघटना तयार केली, ते जिथे असतील तिथे त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देईल.
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान दोन दिवसांच्या यूएई दौऱ्यावर, बीएपीएस मंदिराचे करणार उद्घाटन)
संसदेत राम मंदिराबाबतचा आभार प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर विविध नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी भाषण केलं. यावेळी त्यांनी आमच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असल्याचही म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community