पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या म्हणजेच गुरुवार, २७ जुलै रोजी राजस्थान तर २८ जुलै रोजी गुजरातचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) राजस्थानमधील सीकर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास कामांची पायाभरणी करतील. तसेच काही प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान गुजरातच्या राजकोटमध्ये पोहोचतील. त्यानंतर राजकोट विमानतळापासून त्यांची रॅली निघणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी राजकोटच्या रेसकोर्स मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. तसेच गांधीनगर येथील महात्मा मंदिर इथे सेमीकॉन इंडिया २०२३ चे उद्घाटन करतील.
(हेही वाचा – Kargil Vijay Divas 2023 : कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धाचे वीर)
शेतकऱ्यांना लाभ देणारे महत्वाचे पाऊल म्हणून पंतप्रधान (Narendra Modi) १.२५ लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे (PMKSKs) राष्ट्राला समर्पित करतील. शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी एकाच जागी उपाययोजना देण्यासाठी ही केंद्रे विकसित केली जात आहेत. कृषी संबंधित साधने/उपकरणे (खते, बियाणे, अवजारे) यांच्या माहितीपासून ते माती, बियाणे आणि खतांच्या चाचणी सुविधांपर्यंत, विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करुन देत, पीएम किसान समृद्धी केंद्रे ही देशातील शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय, तालुका/जिल्हा स्तरावरील केंद्रांवर किरकोळ खत विक्रेत्यांची नियमित क्षमता वाढ सुनिश्चित करतील.पंतप्रधान (Narendra Modi) युरिया गोल्ड या युरिया खताच्या वेगळ्या प्रकाराचा, ज्यावर सल्फरचा लेप आहे अशा उत्पादनाचेही उद्घाटन करतील.
या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधानांच्या (Narendra Modi) हस्ते १५०० शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ओ एन डी सी) वर लाँच करण्यात येईल. ओ एन डी सी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल विपणन, ऑनलाईन देयके, व्यवसाय ते व्यवसाय (B2B) आणि व्यवसाय ते ग्राहक व्यवहार करता येतील. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाच्या वाढीला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत १४ व्या हप्त्याची रक्कम ८.५ कोटी हून अधिक लाभार्थ्यांना १७ हजार कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जारी केले जातील.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) राजस्थानच्या एकदिवसीय दौऱ्यात चित्तौडगड, ढोलपूर, सिरोही, सीकर आणि श्री गंगानागर येथे पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन करणार असून बारन, बुंदी, करौली, झुंझुनू, सवाई माधोपूर, जैसलमेर आणि टोंक येथे सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करणार आहेत. याद्वारे राजस्थान मध्ये आरोग्यविषयक पायाभूत सेवासुविधांचा मोठा विस्तार अनुभवता येईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ‘विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयांसह संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी’ केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ही वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असलेली पाच वैद्यकीय महाविद्यालये १,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आली आहेत, तर ज्या सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केली जाईल त्यासाठी २,२७५ कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community