Narendra Modi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली, ‘X’वर ह्रदयस्पर्शी व्हिडिओ शेअर करून म्हणाले…

147
Narendra Modi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली, 'X'वर ह्रदयस्पर्शी व्हिडिओ शेअर करून म्हणाले.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. ‘भारतमातेचे कर्मठ सुपुत्र वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली’, असे पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ‘X’वर पोस्ट केले आहे. (Narendra Modi)

याशिवाय पंतप्रधानांनी त्यांच्या आवाजातील एक व्हिडियोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडियो अतिशय ह्रदयस्पर्शी असून त्यामध्ये त्यांनी वीर सावरकरांच्या गौरवोद्गगार काढले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनीही वीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि त्यांचे बलिदान आम्हाला प्रेरणा आणि शक्ती देत ​​राहील, असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.