Narendra Modi: पंतप्रधानांचा प्रचार रथ म्हणजे अभेद्य किल्ला, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

236
Narendra Modi: पंतप्रधानांचा प्रचार रथ म्हणजे अभेद्य किल्ला, जाणून घ्या वैशिष्ट्ये...
Narendra Modi: पंतप्रधानांचा प्रचार रथ म्हणजे अभेद्य किल्ला, जाणून घ्या वैशिष्ट्ये...
  • वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ज्या रथावर स्वार होऊन देशभरात रोड शो करीत आहेत तो रथ निव्वळ एक गाडी नव्हे; तर एक प्रकारचा अभेद्य किल्ला आहे. आग, ऊन, वारा, पाऊस तर सोडाच बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बसुद्धा पंतप्रधानांच्या केसाला धक्का लावू शकत नाही, अशी अभेद्य सुरक्षा यंत्रणा या रथाला बसवण्यात आली आहे.

या रथाची उंची ११ फूट उंच आहे. यामुळे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) जनतेशी सहज संवाद साधू शकतात. एनएसजीचे कमांडो ३ दिवसांपूर्वीच रथ आपल्या ताब्यात घेतात. २५ मिमी धातूची प्लेट रथाला लावल्यामुळे रथाचे बॉम्बपासून रक्षण होते. १८व्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत त्यांच्यासारखा प्रचार करणारा एकही नेता शोधूनही सापडणार नाही. एका दिवसात अनेक प्रचार सभा आणि रोड शो ते करीत आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची त्यांची तळमळ यातून दिसून येते.

मात्र, ज्या प्रचार रथावर स्वार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपा आणि रालोआच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. तो प्रचार रथ कसा आहे? याची माहिती फार कमी लोकांना आहे. हा प्रचार रथ साधारण नाही, तर असाधारण असा आहे. निवडणूक व्यवस्थापन, जनसंपर्क, गर्दी व्यवस्थापन आणि कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून पंतप्रधानांना सुरक्षित ठेवणारा असा रथ आहे. यासाठी इसुझू कंपनीचे डी-मॅक्स मॉडेल वापरले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बहुगुणी प्रचार रथावर स्वार होऊन देशाला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी निवडणुकीचा प्रचार करीत आहेत. हा रथ देशातील तज्ज्ञांनी बनविला आहे. हा रथ केवळ प्रचार रथ नसून एक प्रकारे अभेद्य किल्ल्याप्रमाणेच आहे. या रथाचा चालक पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी असतो. अलीकडेच त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात भव्यदिव्य रोड शो केला होता. यापूर्वीही त्यांनी अनेक रोड शो केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते येथे प्रचार सभा घेणार आहेत आणि रोड शो करणाार आहेत.

20 गाड्या तयार केल्या…
या प्रचार रथाची उपयोगिता लक्षात आल्यानंतर अशा प्रकारच्या 20 गाड्या बनविण्यात आल्या आहेत. या गाडीमुळे ठिकठिकाणी उभे राहणाऱ्या लोकांना प्रतिसाद देणे अतिशय सोपे झाले आहे. या रथात उभे राहून मोदी सहजरित्या लोकांचे अभिवादन स्वीकार करू शकतात. रोड शोमुळे जनताही आकर्षित होत आहे. यामुळे नेता आणि जनता यांच्यातील जवळीक अधिक घट्ट होत गेली.

ही वैशिष्ट्ये आहेत
– अहमदाबादमध्ये हा रथ बनविणे आणि या रथाची देखरेख भाजपा कार्यालयातील एका नेत्याकडे सोपविण्यात आली आहे. पाच सीटर कारच्या खालच्या भागात २५ मिमीची मेटल प्लेट बसविण्यात आली आहे. बॉम्बस्फोट झाला, तरी या प्लेटमुळे गाडीत बसलेल्यांच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही.

– कारच्या मागच्या बाजूला जेथे पीएम मोदी उभे राहतात तेथे दोन्ही बाजूला ५-५ मिमीच्या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. या सर्व बुलेट प्रूफ आहेत. कारमध्ये एक एनएसजी कमांडो असतो आणि एक अतिरिक्त ड्रायव्हर असतो. पंतप्रधानांच्या प्रत्येक बाजूला एक नेता उभा राहू शकतो आणि मागच्या बाजूला ४ जण उभे राहू शकतील एवढी जागा असते.

– पंतप्रधानांना उभे राहता यावे यासाठी ६ इंचांचा स्टूल ठेवण्यात आला आहे. या स्टूलवर उभे राहून मोदी लोकांशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतात. मोदींच्या चेहऱ्यासमोर एक एसी पॅनल आणि एलईडी बसवण्यात आले आहे. जेणेकरून कडक उन्हात आणि रात्रीही रोड शो सहज करता येईल. कारच्या समोर आणि दोन्ही बाजूला फक्त पीएम मोदींचा फोटो आहे.

– एका ठिकाणी रोड शो झाला की, लगेच या प्रचार रथाला सर्व्हिसिंगसाठी पाठविले जाते. अर्थात प्रत्येक रोड शोनंतर गाडीची सर्व्हिसिंग होत असते. जेव्हा रोड शो नसतो तेव्हा हा प्रचार रथ भाजपाच्या प्रदेश कार्यालयात असतो. येथे राज्याच्या सरचिटणीसपदाचा नेता या रथाची सुरक्षा व्यवस्था पाहतो.

– नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, बंगाल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये रोड शो केले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि सहकार मंत्री अमित शहा यांनीही अहमदाबादमध्ये रोड शो केला आहे.

रणनीतीची जबाबदारी स्थानिक युनिटच्या हातात
रोड शोची रणनीती बनविण्याची जबाबदारी पक्षाच्या स्थानिक युनिटकडे असते. रोड शोपूर्वी स्थानिक पक्षाचे नेते त्या मार्गावर चालतात आणि प्रत्येक भागाची पाहणी करतात. व्यापक सुरक्षा व्यवस्था केली जाते. संपूर्ण रोड शोमध्ये एसपीजीची टीम पायी चालत असते. वाराणसीतील रोड शोदरम्यान या कारचा चालक लखनौचे अमित गुप्ता हे होते. रोड शोच्या ३ दिवस आधी ही गाडी एनएसजी आपल्या ताब्यात घेते. अशा ३ गाड्या लखनो पक्षाच्या मुख्यालयात ठेवण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.