Narendra Modi: राहुल गांधींना वायनाडदेखील सोडावे लागेल, नरेंद्र मोदींचा दावा

राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

192
Lok Sabha Election 2024: 'तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज', मोदींनी केलं युवा आणि महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वायनाडमधील सीट संकटात दिसते आहे. त्यांना अमेठी प्रमाणेच वायनाडदेखील सोडावे लागेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. नांदेड येथे शनिवारी, (२० एप्रिल) आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, प्रतापराव चिखलीकर, महादेव जानकर, बाबुराव कदम आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी २०१९मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. नांदेडच्या सभेत पंतप्रधान म्हणाले की, काल देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यांनी मतदान केले, विशेषत: ज्यांनी पहिल्यांदा मतदान केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. मतदानानंतर बूथ स्तरापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेले विश्लेषण आणि जी माहिती मिळत आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान झाल्याचा विश्वास पक्का होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विरोधकांच्या इंडी आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले की, इंडी आघाडीमधील लोक आपल्या भ्रष्टाचार पांघरूण घालण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कसे एकत्र आले आहेत हे मतदारही पाहत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडी आघाडीला पूर्णपणे नाकारल्याच्याचे मोदींनी सांगितले.

(हेही वाचा –Ambadas Danve: जिल्हाप्रमुखपदावरून मला हटवण्याचे खैरेंचे प्रयत्न, खैरेंच्या उपस्थितीत अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट! )

या निवडणुकीत इंडी आघाडीच्या लोकांना उमेदवारच मिळत नाहीत. त्यांचे नेते बहुतांश जागांवर प्रचाराला जात नाहीत. हे काँग्रेस कुटुंब स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काँग्रेसलाच मतदान करणार नाही, कारण ते जिथे राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. ज्या कुटुंबावर काँग्रेस चालते तेच कुटुंब काँग्रेसला मत देऊ शकणार नसल्याचे मोदी म्हणाले. या देशातील २५टक्के जागा अशा आहेत जिथे इंडी आघाडीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात. एकमेकांना शिव्या घालतात. केरळचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काँग्रेसच्या युवराजांवर टीका करीत आहेत त्यावरून असे वाटते की, त्यांना अमेठी प्रमाणेच वायनाड सोडून पळावे लागेल. इंडी आघाडीतील नेते ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.