श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी विश्वासाने बिजे रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आमच्या सर्वांजवळ या महान नेत्यांचा वारसा आहे, त्याचा आम्हाला गर्व असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी आजचा क्षण भावूक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहात बोलत होते.
(हेही वाचा – Vidhan Sabha Election : लोकसभेचे झालं विधानसभेचे काय ?; कोण राहील सोबत कोण जाईल सोडून ?)
ही ऑरगॅनिक अलायन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, जे राजकीय तज्ज्ञ आहेत, जर त्यांनी मुक्त मनाने विचार केला, तर एनडीए हे सरकार मिळवण्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी जमलेली टोळी नसल्याचे त्यांच्या लक्षात येईल. NDA हा देशसेवेसाठी कटिबद्ध असलेला हा समूह आहे. देशाच्या राजकारणातील ही ऑरगॅनिक अलायन्स आहे. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी विश्वासाने बिजं रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आमच्या सर्वांकडे या महान नेत्यांचा वारसा असल्याचा आम्हाला गर्व आहे.
या वेळी पंतप्रधानांनी एनडीएच्या यशाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, एनडीएला तीन दशके पूर्ण झाली आहेत. ही सामान्य घटना नाही. तीन दशके हा खूप मोठा काळ असून या काळात एनडीए एकत्र आहे. एनडीए ही सर्वात यशस्वी आघाडी आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ असतो, आम्ही पाच पाच वर्षांचे तीन टर्म पूर्ण केले आहेत. आता हीच आघाडी चौथ्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजपर्यंत एकही आघाडी इतकी यशस्वी ठरलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community