PM Narendra Modi : मागील ७० वर्षांत एकही युद्धस्मारक बांधले नाही – पंतप्रधानांचा हल्लाबोल

110
गेल्या 70 वर्षात विरोधकांनी एकही युद्धस्मारक बांधलं नाही. आमच्या सरकारने जेव्हा ते बांधलं तेव्हा मात्र यांनी विरोध केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टेच्यू ऑफ युनिटी येथे जाऊन कधी आदरांजली वाहिली नाही. आमचं सरकार हे सकारात्मक राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहे, यांच्या (विरोधकांच्या) असल्या क्षुल्लक राजकारणापेक्षा आम्ही विकासाला प्राधान्य देतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ६ ऑगस्ट रोजी ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाचा विकास हा देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावा यााठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत. मोदींनी त्यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेचाही उल्लेख केला. भारतीय रेल्वेचे कौतुक करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या रेल्वेने अलिकडच्या काही वर्षांमध्ये १५ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असतात. संसद भवनाच्या नवीन इमारतीलाही त्यांनी विरोधी केला होता. हे लोक कधी स्टेच्यू ऑफ युनिटीकडे फिरकले नाहीत. सरदार पटेल यांच्या पुढे नतमस्तक झाले नाहीत. हे लोक स्वतः काही करणार नाहीत आणि दुसऱ्याला करू देणार नाहीत. ना काम करणार ना, करू देणार, ही त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची वृत्ती आहे आणि ते आजही त्याच वृत्तीला चिकटून बसले आहेत. आम्ही कर्तव्य मार्गाचा विकास केला, परंतु यांनी त्यालाही विरोध केला. यांनी ७० वर्षात देशातील वीरांसाठी किंवा शहिदांसाठी एकही युद्धस्मारक बांधलं नाही. परंतु, आम्ही युद्धस्मारक बांधलं तेव्हा यांनी त्याच्यावर टीका केली. युद्धस्मारकावर टीका करताना यांना लाज कशी नाही वाटली?, असेही पंतप्रधान मोदी PM Narendra Modi म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.