Narendra Modi : डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार

178
Narendra Modi : डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन देखील प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

(हेही वाचा – छोटा शकीलचा शूटर लईक अहमद फिदा हुसैन शेख २५ वर्षांनंतर गजाआड)

या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, रविंद्र धंगेकर, अश्विनी जगताप यांच्यासह मुख्य सचिव मनोज सवनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, के. एच. गोविंद राज, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पी. एमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सुक्या कचऱ्यापासून ७०० टी.पी.डी क्षमतेच्या प्रकल्पामधून १४ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये १००० टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलीटी व ५०० टी. पी. डी क्षमतेच्या कंपोस्ट प्लांटचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १००० टी. पी. डी. क्षमतेचा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी व ५०० टी. पी. डी. क्षमतेचा मॅकेनिकल कंपोस्ट प्लॅन्ट सप्टेंबर २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आलेला आहे. शहरातील दैनंदिन सुमारे १ हजार १५० मेगा टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. ७०० मेगा टन सुक्या कचऱ्यापासून १४ मेगावॅट वीजनिर्मिती करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२ मेगावॅट तयार झालेली वीज महानगरपालिका वापरणार आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायवेट लिमिटेड यांच्या मार्फत विकसित केला गेला असून २१ वर्षे कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये खर्च झालेला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.