स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. अत्यंत वेदनादायीस्थितीत ते अंदमानात शिक्षा भोगत होते. याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वातंत्र्य लढ्यात कारागृहात शिक्षा भोगत असताना वीर सावरकर यांनी चिपळ्यासारख्या हातकड्या वाजवत संत तुकारामांचे अभंग गायले होते’, असे म्हटले. पुण्याजवळील देहू येथे १७व्या शतकातील संत तुकाराम महाराज मंदिरात शिला मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर वारकरी बांधवांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते.
शिवरायांच्या जीवनात संत तुकाराम यांची भूमिका महत्वाची
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातही संत तुकाराम महाराज यांनी मोठी भूमिका निभावली आहे. विविध कालखंडात संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रेरणादायी ठरले. पंढरपूरची वारी, ओडीसातील भगवान जगनाथाची यात्रा, चारधाम यात्रा या सर्व सामाजिक आणि अध्यात्मिक गतिशीलतचे दर्शक आहे. देशभरात होणाऱ्या यात्रा देशाला ऊर्जा देतात, या माध्यमातून भारताला संघटित ठेवले आहे. देशाच्या विविधतेला जोडले आहे. प्राचीन ओळख परंपरा सुरक्षित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे. आज पंढरपूर पालखी मार्गाचे आधुनिकीकरण होत आहे, अयोध्येत भव्य राम मंदिर होत आहे, विकास होत आहे. ८ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच तीर्थांचा विकास होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन होणार आहे, हीदेखील आपल्या संतांचीच कृपा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community