Naresh Mhaske: उबाठा गटाचे २ खासदार शिंदेंकडे येणार, नरेश म्हस्के पत्रकार परिषदेत म्हणाले…

पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी सांगितले की, उबाठा गटाच्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे.

264
Naresh Mhaske: उबाठा गटाचे २ खासदार शिंदेंकडे येणार, नरेश म्हस्के पत्रकार परिषदेत म्हणाले...

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची शनिवारी, (८ जून) दिल्लीत पत्रकार परिषद झाली. यावेळी मोदींना पाठिंबा द्यायचा आहे, मोठा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेला तोंड फुटलं आहे. (Naresh Mhaske)

पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी सांगितले की, उबाठा गटाच्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांना मोदिंना पाठिंबा द्यायचा आहे. ते पुढे म्हणाले की, ‘ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. अनेक शिवसैनिक शिंदे गटात येण्यासाठी आमच्याशी संवाद साधत आहेत. यावर एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत.’ (Naresh Mhaske)

(हेही वाचा – Bihar Bird Sanctuarie: बिहारमधील ‘या’ २ पक्षी अभयारण्यांचा पाणथळ क्षेत्रांच्या जागतिक यादीत समावेश )

मतदार आमच्यासोबत नसते तर…
उबाठाच्या २ खासदारांना मोदींना पाठिंबा द्यायचा असला, तरी अपात्रतेचा विषय असल्यामुळं ते थांबले आहेत, मात्र ६ लोकं जमवून ते पुन्हा आमच्यासोबत येणार आहेत. हे काल रात्री दिल्लीत घडलं आहे. आम्हाला प्रेशर टॅक्टिक करण्याची गरज नाही. मतदार आमच्यासोबत नसते, तर आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो असतो का ?, असा प्रश्न म्हस्के यांनी केला.

उबाठाचा मूळ मतदार त्यांच्यापासून दूर गेला
विकासकामं व्हावीत यासाठी ठाकरेंचे खासदार आमच्यासोबत यायला तयार झाले आहेत. शिवसेनेच्या तत्त्वांसाठी ते आमच्या सोबत यायला तयार आहेत. गेले २ दिवस ठाकरे गटाचे आणि शरद पवार यांच्या पे रोलवरील व्यक्ती खोट्या गोष्टी मीडिया समोर सांगत आहेत. उबाठाचा मूळ मतदार त्यांच्यापासून दूर गेला आहे. काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन, मुल्ला मौलवींनी लाखो रुपये वाटून एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका समाजाची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केला गेला, असा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

केवळ राजकारणापोटी, असे दावे का?
एक दिवसापूर्वी, शिंदे गटाचे ५ ते ६ आमदार ठाकरे गटात येणार असल्याचा दावा ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने केला होता. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे गटाकडूनदेखील मोठा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ राजकारणापोटी, असे दावे केले जात आहेत का? अशी शंका घेण्यास वाव आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.