शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी टीका ठाकरे गटाने शिवसेनेवर (शिंदे गटावर) केली आहे. सोमवारी प्रकाशित झालेल्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातील अग्रलेखातून ही जहरी टीका करण्यात आली आहे. याच टीकेला उत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिले आहे. संजय राऊत यांची अवस्था उकिरड्यासारखी झाल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
नरेश म्हस्के नक्की काय म्हणाले?
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, ‘संजय राऊतांची अवस्था उकिरड्याप्रमाणे झालेली आहे. आपण पाहता, मध्यंतरी अजित पवार सुद्धा म्हणाले, कोण संजय राऊत?. नाना पटोले म्हणाले, आमच्यामध्ये चोमटेगिरी करू नये. त्यामुळे राष्ट्रवादीपण त्यांना हकलून दिले, काँग्रेसपण हकलून दिले, त्यामुळे ते स्वतः उकिरड्यासारखे झाले आहेत. शिवसेनेची अवस्था त्यांनी उकिरड्यासारखी केली आहे. उद्धव ठाकरेंचीही अवस्था उकिरड्यासारखी करून ठेवली आहे. राष्ट्रवादी फोडण्यासाठी निघालेले. परंतु राष्ट्रवादी सुद्धा काही दिवसांनंतर हाकलून देतील. यांची जी महाविकास आघाडी आहे, ती महाभकास आघाडी आहे. काही दिवसांत एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात करतील.’
(हेही वाचा – Karnataka Elections 2023: काँग्रेसचा बदला पंतप्रधान मोदी नाहीतर कर्नाटकातील जनता घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
दरम्यान सोमवारच्या सामना अग्रलेखातून फक्त शिवसेनेवरच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. ‘पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले,’ असा सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाकडून शरद पवारांवर आरोप करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community