-
प्रतिनिधी
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, “एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते,” आणि त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांवर टीका केली आहे.
“संजय राऊत रोज नशेत असतात” – म्हस्के यांचा आरोप
नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी थेट संजय राऊतांच्या बोलण्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “कालची भांग संजय राऊत यांची उतरलेली नाही, असं मी म्हणणार नाही. कारण संजय राऊत रोजच नशा करून वक्तव्य करत असतात.”
तसेच, “जर एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, हे जर तुम्हाला आधीच माहित होतं, तर तुम्ही त्यांना शिवसेनेचा नेता का बनवलं? त्यांना नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का?” असा सवाल त्यांनी राऊतांना विचारला.
(हेही वाचा – मुंबईत उच्चभ्रू Sex Racket उद्ध्वस्त; हिंदी मालिकेतील ४ अभिनेत्रींची सुटका, एकाला अटक)
“शिंदेंची लोकप्रियता तुम्ही आधीच मान्य केली होती”
म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करत म्हटले, “उद्धव ठाकरे घाबरत होते, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या लोकप्रियतेला भेदरून हे निर्णय घेतले होते.”
तसेच, “ज्या झाडाला फळं लागतात, त्याच झाडावर लोक दगड मारतात. आज सर्व पक्ष एकनाथ शिंदे यांच्या मागे लागले आहेत, कारण ते जनतेमध्ये लोकप्रिय आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेची आक्रमक भूमिका
शिवसेनेने यापूर्वीही संजय राऊतांच्या वक्तव्यांवर टीका केली होती. मात्र, आता त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत, संजय राऊत हे केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केला आहे.
नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या या जोरदार हल्ल्यानंतर शिवसेना उबाठाकडून यावर काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत लवकरच यावर प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community