शिवसेना खासदार Naresh Mhaske यांनी राहुल गांधींकडे केली ‘ही’ मागणी

172
शिवसेना खासदार Naresh Mhaske यांनी राहुल गांधींकडे केली 'ही' मागणी

मराठी समाजाबाबत घृणास्पद टिप्पणी करणारे काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांची पदावरुन हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. मराठी समाजाबद्दल काँग्रेस प्रवक्त्यांकडून होणारी अपमानास्पद वक्तव्ये शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी गांधी यांना लिहलेल्या पत्रातून दिला.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी एका चर्चेत मराठी समाजाबाबत घृणास्पद टिप्पणी केली. मराठी समाज बलात्कारी असल्याचे विकृत भाष्य आलोक शर्मा यांनी केले. काँग्रेस प्रवक्त्यांकडून अशी वक्तव्ये येणे निंदनीय असून त्याचा तीव्र शब्दांत खासदार म्हस्के (Naresh Mhaske) यांनी निषेध केला आहे.

New Project 92

(हेही वाचा – Central Government: पॅरासिटामोलसह १५० पेक्षा अधिक औषधांवर केंद्र सरकारची बंदी)

ते पुढे म्हणाले की, मराठी समाज, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हा शिवसेनेचा जीव की प्राण आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्क्यांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यामुळे मराठी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्ये शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार म्हस्के (Naresh Mhaske) यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

आलोक शर्मा यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्याविरोधात शिवसेनेने पोलिसांत तक्रार केली आहे. केवळ मराठीच नव्हे तर कोणत्याही समाजाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे असभ्यतेचे आणि विकृतीचे लक्षण आहे. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या अशा विकृत आलोक शर्माला काँग्रेस प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करुन राहुल गांधी यांनी संवेदनशीलपणा दाखवावा, असे आवाहन खासदार म्हस्के (Naresh Mhaske) यांनी पत्रातून केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.