Naresh Mhaske यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – एकनाथ शिंदे निवडणुक… 

129
Naresh Mhaske यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले - एकनाथ शिंदे निवडणुक… 
Naresh Mhaske यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले - एकनाथ शिंदे निवडणुक… 

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly 2024) जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधक मंडळी ही प्रचार सभांच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूचे जागावाटप पूर्ण झाले असून, कोणता उमेदवार कुठून कुणाविरोधात निवडणूक लढवत आहे तेही स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Naresh Mhaske)

या मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढण्यास तयार नव्हते, असे सांगत त्या घटनेची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील मतदार संघामधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता. परंतु कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढलो तर, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणे शक्य होणार नाही. या उमेदवारांच्या प्रचाराला जाता यावे यासाठी कोपरी पाचपाखाडीतून निवडणुक लढणार नाही, असे शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांना सांगितले होते. तुम्ही अर्ज भरा, आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजून तुमचा प्रचार करू अशी विनंती शिंदेंना केली. त्यानंतर ते निवडणूक लढण्याचा विचार करू लागले. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) स्वत:पेक्षा इतरांचा विचार करतात. त्यांचे सर्व ठिकाणी लक्ष आहे असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

(हेही वाचा – दिल्लीतील पेंढ्याच्या समस्येविरोधात Central Govt ची कठोर भूमिका; दंडाच्या रकमेत केली दुप्पट वाढ)

दरम्यान, ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात (Kopri-Pachpakkhadi Constituency) महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. तर मनसेने या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवला नाही. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीकडून आनंद दिघेंचे (Anand Dighe) पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.