विरोधक म्हणजे दुतोंडी साप; बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी Naresh Mhaske यांची टीका

विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोबल उंचावले जावे, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावे.

150

बदलापूर येथील अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आंदोलनासाठी बाहेरुन बस भरून माणसे आणली आणि आरोपीला ताबडतोब फाशी द्या, बेंबीच्या देठापासून असे विरोधक ओरडत होते. मात्र नराधमाचा पोलिसांनी स्वसंरक्षणात केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर विरोधकांना त्याचा इतका पुळका आला आहे. विरोधक हे दुतोंडी साप आहेत, अशा शब्दांत खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी टीकास्त्र सोडले. पोलिसांच्या शौर्यावर संशय घेणे, हे दुदैव असून प्रथम त्यांनी माहिती घेऊनच प्रतिक्रिया द्यावी असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याची १०० कोटींच्या वसुली करता हत्या करणारा सचिन वाझे हा पोलिस अधिकारी संजय राऊत यांचा पीए होता. वाझेचे तोंडभरुन कौतुक करणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरेन प्रकरणी विधान परिषदेत मूग गिळून बसले होते, अशी टीका म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली. तेलंगाणातील बलात्कार प्रकरणात एनकाउंटर करणाऱ्या पोलिसांचे सामनात जाहीर कौतुक केले. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही संशय व्यक्त करता, त्यांचे कौतुक करायला तुम्हाला लाज वाटते का, असा सवाल म्हस्के यांनी विचारला. केवळ खुर्चीसाठी आरोपीच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या विरोधकांना महाराष्ट्रातील जनता लाथ मारुन हाकलून देईल, असेही त्यांनी म्हटले.

(हेही वाचा आधी विरोधक म्हणायचे Akshay Shinde ला लगेच फाशी द्या; मग आता का ओरडत आहेत?; अजित पवारांचा संताप)

जखमी पोलीस अधिकाऱ्याची शिवसेनेकडून विचारपूस

आरोपी अक्षय याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरे यांची ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारपूस केली. विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोबल उंचावले जावे, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावे. तसेच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतल्याचे म्हस्के म्हणाले. शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले यावेळी उपस्थित होत्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.