Narhari Zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य आलं समोर

193
Narhari Zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य आलं समोर
Narhari Zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य आलं समोर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेत्यांसोबत नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नरहरी झिरवाळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून भारती पवार तर मविआकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच दिंडोरीमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आमदार आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Narhari Zirwal)

(हेही वाचा –Pune NDA: पुण्यात एनडीए परिसरात सापडला बॅाम्ब!)

नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) व्हायरल फोटोमागचं सत्य सांगताना म्हणाले, “माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजा करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रह खातर मी खुर्चीवर बसलो. त्यावेळी शेजारी दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेते येऊन बसले. काही मिनिटातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी तिथून निघून गेले. मी अजित पवारांसोबतच आहे.” असं नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) म्हणाले.

(हेही वाचा –Accident In Up: लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांनी घेतला पेट, वरासह ४ जणांचा मृत्यू)

कुणीतरी फोटो काढुन व्हायरल केला असल्याचं झिरवळ यांनी सांगितलं. शिवाय, अशाप्रकारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन आता मतदार एवढा खुळा राहिला नाही. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. (Narhari Zirwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.