राज्यांकडील लसींच्या वितरणाचे अधिकार केंद्राने घेतले काढून !

126

‘२१ जून’ आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून त्या दिवसापासून देशातील १८ वयोगटापुढील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. या आधी या वयोगटासाठी लसीकरणाची जबाबदारी राज्यांना दिली होती. त्यासाठी २५ टक्के लसी राज्यांना उत्पादकांकडून खरेदी करण्याचे अधिकार दिले होते, मात्र आता ते केंद्राने घेतले आहेत. यापुढे केंद्र उत्पादकांकडून ७५ टक्के लसी खरेदी करून ते राज्यांना देणार आहे. त्यामुळे यापुढे १८ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत लस दिली जाईल, राज्यांना आठवड्याआधीच किती लस पुरवणार हे सांगितले जाईल. त्यामुळे वाद होण्याची शक्यता होणार नाही.  अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना केली.

लसीकरणाबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांपासून सुरक्षित रहा! 

२१ जूनपासून १८ वयोगटापुढील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. ज्यांना मोफत लस घ्यायची नसेल त्यांनाही खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येईल, त्यासाठी खासगी रुग्णालये २५ टक्के लसी उत्पादकांकडून खरेदी करू शकतात. लसीकरणाबाबत समाजात अनेकजण गैरसमज पसरवत आहे. ते सर्वसामान्य आणि भोळ्या भाबड्या लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित रहा. आणि लसीकरण करणे किती महत्वाचे आहे, याबाबत युवा वर्गाने जागृती करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

(हेही वाचा : मुख्यमंत्री घेणार मोदींची भेट… काय आहे भेटीमागचे कारण?)

राज्यांना समजले लसी मिळवणे किती कठीण काम! 

अनेक राज्यांनी केंद्राच्या लस वितरण व्यवस्था, लसीकारणासाठी घालून दिलेली वयोमर्यादा या सर्व विषयांवर टीका करणे सुरु केले होते. त्यामुळे केंद्राने २५ टक्के लस राज्यांना खरेदी करण्याचे अधिकार दिले. त्याप्रमाणे राज्यांनी देशातील लस उत्पादक तसेच विदेशातीलही लस उत्पादकांना संपर्क करून लस खरेदी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्यांना कळाले असेल कि, लस वितरण व्यवस्था किती जिकरीची आहे. विचार करा, अनेकांनी स्वदेशी लसीवर आक्षेप घेतले होते. आज भारताकडे स्वतःची लस नसती तर काय परिस्थिती उद्भवली असती, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लहान मुलांच्या लसींची चाचणी सुरु 

लहान मुलांचेही लसीकरण करण्यासाठी मुलांना द्यावयाच्या लसीची चाचणी सुरु करण्यात आली आहे. ही लसही लवकरच बाजारात येईल आणि अवघा देश सुरक्षित होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच नाकावाटे देण्यात येणाऱ्या आणखी एका लसीची चाचणी सुरु आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

८० कोटी जनतेला मोफत धान्य!

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील ८० कोटी जणांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य पुरवणार आहे. दीपावलीपर्यंत ही योजना लागू राहणार आहे. त्यामुळे कुणालाही उपाशी राहावे लागणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • कोरोना विरोधातील लढाईत आपण अनेकांना गमावले आहे
  • दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली
  • देशात कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही
  • कोरोनाशी लढाई अद्याप सुरू आहे
  • आरोग्य व्यवस्थेवर मोठे आव्हान उभे राहिले होते
  • भारतात बनवलेली लस नसती तर आज काय अवस्था असती
  • कोरोना लढाईत लसीकरण हे सुरक्षा कवच आहे. मिशन इंद्रधनुष्य आम्ही लाँच केले.
  • आम्हाला आमच्या देशातली गरिबांची चिंता आहे
  • ऑक्सिजन वाढवण्यावर आमचा भर
  • कोरोना विरोधातील लढाईत मास्क, सॅनिटायझर, अंतर महत्वाचे. मागील काही वर्षांचा विचार केला, तर देशात 100 टक्के लसीकरणासाठी 40 वर्ष लागली असती.
  • सरकारने मिशन इंद्र धनुष्य मोहीम राबवली
  • देशात 23 कोटी नागरिकांचे लसीकरण
  • देशात सध्या 7 कंपन्याकडून लस तयार करण्याचे काम
  • परदेशातून लस आणण्याकडे भर
  • विदेशातून लस आणण्यासाठी दशक लागली असती
  • ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका त्यांचे पहिले लसीकरण
  • केंद्राने राज्यांना एक नियमावली बनवून दिली ज्याने राज्याला निर्णय घेता येईल
  • 16 जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत लसीकरण हे केंद्राकडून झाले
  • केंद्राने अनेक राज्यांच्या मागण्या मान्य केल्या
  • काही मीडियानी एक कॅम्पेन देखील तयार केले
  • नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकडे सरकारचा भर
  • 21 जूनपासून 18 वर्षांपुढील सर्व वर्गाला केंद्र सरकार मोफत लस देणार
  • राज्य सरकारला लसीवर कोणताच खर्च होणार नाही
  • सर्वाचे केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार
  • ज्याला मोफत लस नको त्याचे देखील भान राखले गेले आहे.
  • एका आठवडा आधीच राज्यांना त्यांना पुढील आठवड्यात किती लसी उपलब्ध होतील, याची माहिती देणार.
  • वाद होण्याची गरज नाही
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ८० कोटी जणांना नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्न धान्य पुरवणार
  • लसींबाबत अफवा पसरवत आहेत ते भोळ्या भाबड्यांच्या जीवाशी खेळ खेळात आहेत
  • त्यांच्यापासून सुरक्षित राहा, लसीकरणाबाबत जागरूकता आणा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.