भुजबळांच्या निषेधार्थ घरापुढे काळी रांगोळी! नेमकं काय आहे प्रकरण

129

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा केली. या नव्या कायद्यानुसार प्र. कुलपती हे पद तयार करण्यात आले. त्यामुळे कुलपतींचे अधिकार उच्चशिक्षण मंत्री यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठे राजकारणाचा अड्डा बनतील असा विरोधकांचा आरोप आहे. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय युवामोर्चा युवती विभागाने भुजबळांच्या घरासमोर काळी रांगोळी काढून निषेध नोंदवला आहे. ‘भुजबळ फार्म’ बाहेर हा प्रकार घडला. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

अनोखे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या या सुधारणेचा विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला. त्यावरून ठिकठिकाणी राज्यभर आंदोलन सुरू आहे. छगन भुजबळांच्या घरासमोर असे अनोखे आंदोलन केल्यामुळे अंबड पोलिसांनी कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस ऋषीकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, हरीश दिंडोरकर, स्वाती माळोदे, मयुरी शुक्ल, लीना मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा :शाळा कधी सुरु होणार? राजेश टोपेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती )

मुख्यमंत्र्याना पाठवली पत्रं

या कायद्याला विरोध म्हणून भाजपाच्या युवामोर्चा युवती विभागाने मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत 10 लाख पत्र पाठवली आहेत. तसेच, उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना मेसेज, ई-मेल आणि मिस कॉल्स देऊन आंदोलन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.