Nashik bus Fire:नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

240

नाशिक येथील बस दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेबाबत जिल्हाधिका-यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचारात काही कमी पडू नये, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

( हेही वाचा: नाशिकमध्ये एका खासगी बसला आग लागून 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; 38 जण जखमी )

जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार

नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, जखमींना प्राधान्याने उपचार द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. जखमी असणा-यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्वत: महापालिका आयुक्त हजर असल्याचे, शिंदे यांनी सांगितले. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.