स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा, असा आदेश शनिवार, १ मार्च ला नाशिकच्या न्यायालयाने दिले.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या दरम्यान त्यांनी वर्धा येथे बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा माफीवीर असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. त्या संदर्भात भावना दुखावल्याने नाशिकमधील सावरकरप्रेमी देवेंद्र भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या न्यायालयात बदनामीचा फौजदारी दावा कलम ५००, ५०४ अन्वये दाखल केला आहे. त्यावर सुनावणी झाली असता राहुल गांधी यांनी उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण त्यांचे वकील जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित रहावे, अशी मागणी अर्जदारांनी केली.
(हेही वाचा Prayagraj मधील मुस्लिमबहूल वस्तीत गोवंशाचे कापलेले धड आणि इतर अवशेष धर्मांधांनी हिंदूंच्या घराबाहेर फेकले)
ती मागणी मान्य करण्यात आली. याच वेळी राहुल गांधी यांनी त्यांना न्यायालयात कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची आणि प्रसंगी व्हिडीओ कॉन्फरेंसीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, असाही अर्ज राहुल गांधी यांच्या वकिलांनी सादर केला आहे. मात्र त्यावर पुढील तारखेला म्हणजे ९ मे रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती अॅड मनोज पिंगळे यांनी दिली. (Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community