राष्ट्रवादीच्या अमृता पवार भाजपमध्ये करणार प्रवेश

174

नाशिकचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशाने नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत चुरशीचे राजकारण पाहायला मिळणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहिलेल्या माजी खासदार डाॅक्टर वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमधून भाजपला चांगले बळ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगला डाव खेळल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा: दापोली साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची उच्च न्यायालयात धाव )

कोण आहेत अमृता पवार

नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को.ऑप, बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या पदाधिकारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, माजी खासदार स्वर्गीय वसंतराव पवार व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या अमृता पवार आहेत. पेशाने त्या अॅर्कीटेक्टर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.