सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा जोरदार बोलबाला सुरु आहे. ५ जागांवर होणाऱ्या निवडणुका शिंदे गट आणि भाजप युती सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे. यातील काही जागांवर अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. त्यामध्ये नाशिक येथील पदवीधर मतदार संघ आहे. या जागेवर शुभांगी पाटील यांनी अपेक्षा उमेदवार अर्ज भरला आहे. त्यांना ठाकरे गटाने समर्थन दिले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याला दीड तास बाकी असताना शुभांगी पाटील गायब झाल्या आहेत, त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी भेटल्यावर नॉट रिचेबल
शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. रविवार, १५ जानेवारी रोजी शुभांगी पाटील यांनी मुंबईत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्या नाशिकला गेल्या. तेव्हापासूनच त्या नॉट रिचेबल आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा दीड तास बाकी असतानाच पाटील या नॉट रिचेबल झाल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. यात खळबळजनक काय मला माहीत नाही. माघारीला अवघे दोन तास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार कुठे जातो? कुठे राहतो? हा त्यांचा प्रश्न आहे. नॉट रिचेबल आहे आणि खळबळजनक बातमी आहे. पण यात खळबळजनक काहीच नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. अर्ज कुणी मागे घ्यावा, कुणी ठेवावा याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो 3 वाजेपर्यंत जाहीर होईल, अवघ्या 15 दिवसांपूर्वीच शुभांगी पाटील पक्षात आल्या. त्यांना तिकीटाची गॅरंटी दिली नव्हती. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करेल असं त्यांनी सांगितले होते, असेही महाजन यांनी सांगितले.
(हेही वाचा सोशल मीडियाच्या ‘boycott’ ने बॉलिवूड हादरले)
Join Our WhatsApp Community