ठाकरे गटाला धक्का; नाशिकमधील 50 पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

110

नाशिकमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी,कार्यकर्ते शिंदे गटात सामिल झाले आहेत. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. तर परभणीत महाविकास आघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

संजय राऊत नाशिक दौ-यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधकिरी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिका-यांचा समावेश आहे.

ठाकरेंच्या पक्षाला गळती

संजय राऊत शुक्रवारी दोन दिवसाच्या नाशिक दौ-यावर आहेत. या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार आहे,  मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे.

( हेही वाचा: मुंबई महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प येत्या ३ फेब्रुवारीला‌? )

परभणीत मविआतील 30 नगरसेवक शिंदे गटात

परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या 30 नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.