‘ते’ AB फाॅर्मच चुकीचे; आमच्याविरोधात हे मोठे षड्यंत्र; सत्यजीत तांबेंचा गौप्यस्फोट

127

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजयश्री खेचून आणत तांबे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विजयी झाल्यानंतर 4 फेब्रुवारीला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, आम्हाला दिले गेलेले AB फाॅर्म हे चुकीचे होते आणि योग्य फाॅर्म दिल्यानंतरही तो फाॅर्म सुधीर तांबे यांच्या नावाने पाठवण्यात आला. पक्षश्रेष्ठींकडून एवढ्या गंभीर चुका कशा काय होतात. याचाच अर्थ असा की, हे तांबे कुटुंबियांविरोधात मोठे षड्यंत्र आहे, असा गौप्यस्फोटच सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

( हेही वाचा: कसबा पोटनिवडणुकीत ‘मनसे’ही उमेदवार देणार? राज ठाकरे रविवारी पुणे दौऱ्यावर )

सत्यजीत तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधर अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फाॅर्म देण्यात आले. एबी फाॅर्म हा मुद्दा लहान-सहान नाही,चुकीचा फाॅर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता, असा आरोपही त्यांनी केला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फाॅर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही, असा सवालही त्यांनी केला.

मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो काॅज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आले, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केले. मला काॅंग्रेसमधून बाहेर काढण्याचे काम काही नेत्यांकडून केले जात आहे, असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.

मला माफी मागायला लावली

नागपुरातून मला चुकीचा एबी फाॅर्म देण्यात आला, त्यावर काहीही खुलासा करण्यात आला. पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून तो आताच मिटवावा अशी भूमिका मी घेतल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले. ते म्हणाले की, मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावले. त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केले. त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो, पण एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होते, मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.