मोठी बातमी: सत्यजीत तांबेनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, ‘मी अपक्षच राहणार’

141

नाशिक पदवीधर पदासाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी कोणत्या नाट्यमय गोष्टी घडवून आणल्या गेल्या त्यावर भाष्य करत सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सत्यजीत तांबे म्हणाले की माझ्या या विजयात अनेक संस्था, अनेक पक्षांचा अनेक लोकांचा हात आहे. त्यामुळे मी अपक्षच राहणार आणि वेळोवेळी अनेक पक्षांची मदत घेत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जवळच्या संबंधांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस आणि आपले अनेक वर्षांपासून संबंध आहेत. ते माझ्या मोठ्या बंधूसारखे आहेत. त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले, असे विधान सत्यजीत तांबे यांनी केले.

( हेही वाचा: ‘ते’ AB फाॅर्मच चुकीचे; आमच्याविरोधात हे मोठे षड्यंत्र; सत्यजीत तांबेंचा गौप्यस्फोट )

फडणवीसांचे मार्गदर्शन आधीपासूनच लाभले 

देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध अतिशय जवळचे आहेत. त्यांना मी माझ्या मोठा भावासारखाच मानतो. त्याला कारण म्हणजे माझे दिवंगत बंधू राजीव राजळे हे ज्यावेळी 2004ला पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी तरुण आमदारांचा युथ फोरम नावाचा ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा तरुण आमदार होते. त्यावेळी मी राजीव यांच्यासोबत कार्यक्रमाला जायचो. तिथे देवेंद्र फडणवीसदेखील यायचे. त्यावेळी माझी आणि त्यांची ओळख झाली. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मला पहिल्यापासूनच राहिले, असे सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.