मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. अशातच आता राज्यातील राजकारणामध्ये वेगाने गोष्टी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाला नाशिकमध्ये (Nashik) मोठा धक्का बसला आहे. सहा नेत्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसंच नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनीही सेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
(हेही वाचा – Odisha Train Accident : ‘…म्हणून झाला अपघात’; अपघातामागील कारण आले समोर)
सुरगाणा (Nashik) नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, नगरसेविका अरुणाताई वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
त्याच बरोबर नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आपल्यावर विश्वास ठेवून या राज्यातील अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत. सुरगाणा नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचा देखील खास स्वागत करतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही पहा –
मागील 10-11 महिन्यात सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. सर्व योजनांचे फायदे एकाच छताखाली देण्याचे आपण काम करायचं आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community