Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, कारण काय?

134
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, कारण काय?
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, कारण काय?

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) मतमोजणी होत आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेनेकडून किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. आता मतमोजणी प्रक्रिया थोड्यावेळाकरीता थांबवण्यात आली आहे. (Nashik Teachers Constituency Election 2024)

तीन मतपत्रिका जास्त

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ९३.४८ टक्के मतदान झाले आहे. प्राथमिक फेरीत 64 हजार 848 मतपत्रिका अपेक्षित होत्या. मात्र एका मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर खळबळ उडाली आहे. मतदान टेबलवर मतदानपत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्त निघाल्या आहेत. टेबलवर मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबलवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Nashik Teachers Constituency Election 2024)

कारवाई करा…

याबाबत ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 मत पत्रिका जास्त आढळल्या आहेत.मतमोजणी कक्षातील 22 नंबरच्या टेबलवर मोजण्यात आलेल्या टेबलवर मतपत्रिका जास्त आढळून आल्यात. 3 मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे 3 मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. (Nashik Teachers Constituency Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.