कायम मुस्लिमांची बाजू मांडताना हिंदूंवर टीका करणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अचानक मुसलमानांनाच (Muslim) परखड शब्दांत सुनावले. देशात जे काही चुकीचे चालले आहे, त्यासाठी मोदींना दोष देणे फार सोपे आहे. पण मोदी सत्तेत येण्याआधीही या देशात खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत्या हे वास्तव आहे. भारतात भिन्न धर्मीयांमध्ये छुप्या स्वरुपात नकारात्मक भावना होत्याच. मला लहानपणी मुस्लीम (Muslim) असल्याबाबत हेटाळणीचा सामना करावा लागला होता. मीही इतरांना त्यांच्या धर्मावरून चिडवायचो. मला वाटते या प्रकारच्या भावना या देशात कायम छुप्या स्वरुपात होत्या. मोदींनी या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यात हुशारी दाखवली, पण मुस्लिमांच्याही चुका आहेत, असे नसिरुद्दीन शाह म्हणाले.
धर्मनिरपेक्षता किंवा समानतेचे जे काही उरले-सुरले अवशेष शिल्लक होते, ते उद्ध्वस्त करण्याची संधीच यामुळे उपलब्ध झाली. याआधी आपण सुखी आणि समृद्ध होतो, सगळे काही चांगले होते, असे जे काही दावे केले जातात ते चुकीचे आहेत. तशी परिस्थिती नव्हती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे चित्र चित्रपटांमधून किंवा गाण्यांमधून उभे केले जायचे, ते तसे व्हावे यासाठीचा तो एक प्रयत्न होता. पण मला वाटत नाही की देशाने त्याचा स्वीकार केला आहे. फक्त काहींनी स्वीकार केला. त्यामुळे ही गाणी म्हणजे फक्त शब्दच्छल होता, असेही नसिरुद्दीन शाह म्हणाले.
(हेही वाचा NCP : जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये ‘कोल्ड वॉर’; एकमेकांना सुनावले)
मुस्लिमांचीही चूक
माझ्या सहा पिढ्या या देशात संपल्या, या देशाने मला प्रेम करायला शिकवले. पण काही प्रसंगी मला हा देश काही वेगळाच वाटला, सत्य हे आहे की मुस्लिमांनीही (Muslim) कधी या गोष्टींची तक्रार केली नाही. मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता आहे. त्यांनी शिक्षणाविषयी काळजी करायला हवी. त्यांनी मुलांना आधुनिक गोष्टींचे प्रशिक्षण द्यायला हवे. मदरशांमध्ये मुलांना ठेवून त्यांना कायम धार्मिक गोष्टींचे शिक्षण देण्यापेक्षा त्यांनी मुलांना आधुनिक शिक्षण द्यायला हवे. ही मुस्लिमांची चूक आहे, असेही नसिरुद्दीन शाह म्हणाले.
Join Our WhatsApp Community