मदरशांच्या शाळांमध्ये यापूढे राष्ट्रगीत बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश राज्याने घेतला आहे. आता उत्तर प्रदेश राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक केलं आहे. या शैक्षणिक सत्रापासून मदरशांमध्ये वर्ग सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक केलं आहे.
राष्ट्रगीत बंधनकारक
उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर, मिळालेल्या माहितीनुसार आठवीपर्यंतच्या परीक्षेत विज्ञान, इंग्रजी आणि गणिताच्या प्रश्नांचाही समावेश केला जाणार आहे. मदरसा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. इफ्तिखार अहमद जावेद यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत मदरशांच्या संदर्भात मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यात नवीन सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत देखील बंधनकारक असणार आहे.
( हेही वाचा :“…तर शिवसैनिकाच्या वडापावच्या गाडीवरही ‘ईडी’ची कारवाई होईल” )
बायोमॅट्रीक हजेरी होणार सुरु
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. जावेद म्हणाले, बोर्डाचे रजिस्ट्रार लवकरच एमटीईटीबाबत सरकारला प्रस्ताव पाठवतील. जेणेकरून मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काही रुपरेषा तयार करता येतील. मदरशांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या पाहता अनुदानित मदरशांमध्ये शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणोत्तरापेक्षा जास्त शिक्षक असल्यास शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असून, आता मदरशांमध्येही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community