भविष्यो रक्षति रक्षित: असं का म्हणाल्या स्मृती इराणी?

89

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा 17 वा स्थापना दिन नवी दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात साजरा करण्यात आला. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आयोगाच्या ‘भविष्यो रक्षति रक्षित: या नव्या ध्येय वाक्याचे अनावरण केले. आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कान्गो, महिला आणि बालविकास सचिव इंदीवर पांडे आणि इतर वरिष्ठ अधिकारीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज्यातील मुलांशी संवाद

स्मृती इराणी म्हणाल्या, ‘भविष्यो रक्षति रक्षित: “हे नवीन ध्येयवाक्य आपल्याला आपले भविष्य म्हणजेच देशातील लहान मुलांचे संरक्षण करण्याचा उपदेश करते कारण या मुलांच्या कल्याणातूनच मजबूत देशाचा पाया घातला जाणार आहे.”स्मृती इराणी यांनी यावेळी विविध राज्यांतील मुलांशी संवाद साधला तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांच्या बालपणात केलेल्या कार्याविषयीच्या कथांवर आधारित प्रदर्शनालादेखील भेट दिली आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण केले. सीमा सुरक्षा दलाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या संयुक्त सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले.

( हेही वाचा: रशिया – युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार नाही! जो बायडेन भाषणात काय म्हणाले? )

उपक्रमाचे कौतुक

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तपणे सुरु केलेल्या ‘सहारा’ या उपक्रमाचेदेखील केंद्रीय मंत्री इराणी यांनी कौतुक केले. सीमा सुरक्षा दलातील सर्वोच्च समर्पण करणाऱ्या जवानांच्या मुलांना मनो-सामाजिक समुपदेशन आणि मदत पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या दोन संस्थांनी एकत्र येऊन असा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे कौतुक करून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीटरद्वारे सांगितले की, दोन महिन्यांत अशा प्रकारच्या 300 कॉल्सना योग्य उत्तरे देण्यात आली आहेत आणि वेबलिंकच्या माध्यमातून 127 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.