राज्यात ५,५०० बोगस आदिवासी प्रमाणपत्रे; Tribal समाजाच्या हक्कांवर गदा !

38
राज्यात ५,५०० बोगस आदिवासी प्रमाणपत्रे; Tribal समाजाच्या हक्कांवर गदा !
  • सुजित महामुलकर

देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊण शतक होऊन गेले तरी अद्याप आदिवासी (Tribal) समाजाच्या तोंडचा घास पळवणे थांबलेले नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही आदिवासी असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून जवळपास ५,५०० आदिवासींच्या हक्काच्या नोकरी आणि शैक्षणिक जागांवर बिगर आदिवासींनी डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांनी आदिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आहे तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही बिगर आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन आदिवासी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी राखीव असलेल्या जागा बळकावल्या असल्याची धक्कादायक माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती लागली आहे.

राष्ट्रीय आयोगाकडून आढावा

नवी दिल्लीहून ‘राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगा’ने गेल्या आठवड्यात राज्याला भेट देऊन जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत या तीन वर्षांचा आढावा घेतला. राज्यातील अनुसूचित जमातीबाबत (Tribal) राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती घेत आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : मुस्लिम मतांवर राजकीय पक्षांचा डोळा)

मूलभूत सोयीसुविधा

आदिवासी (Tribal) बांधवांना विकासाची संधी मिळाली पाहिजे, मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी त्यांना आर्थिक, सामजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक अशा मूलभूत सोयीसुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. यासह आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी आयोग काम करीत असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी सांगितले.

१,७७९ बोगस कर्मचारी

यावेळी एक अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालात किती कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला, यांची माहिती देण्यात आली आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत २७,८४३ कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात आली. त्यातील १,७७९ कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस निघाली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने या फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्याची माहिती आयोगाचे सदस्य निरुपम चाकमा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली. (Tribal)

(हेही वाचा – CIDCO lottery च्या घरांचे दर होणार कमी; अध्यक्ष संजय शिरसाट यांचे संकेत)

३,३०७ विद्यार्थ्यांकडून फसवणूक

चाकमा यांनी पुढे सांगितले की केवळ शासकीय नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणातही खोटी प्रमाणपत्रे सापडली आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात ठराविक जागा राखीव असल्याने बिगर आदिवासी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी चढाओढ असते. या प्रवेशासाठी ९५,४१९ विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तपासले असता त्यातील ३,७०७ खोटी असल्याचे आढळून आले आहे. (Tribal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.