-
प्रतिनिधी
सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेला (Conference) सोमवारपासून डेहाराडून येथे सुरुवात झाली. या परिषदेत महाराष्ट्राचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते. देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी या शिबिरात सहभागी झाले आहेत.
(हेही वाचा – Kapil in Captaincy : भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कपिल देवची ‘या’ खेळाडूला पसंती)
या परिषदेत (Conference) सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. विशेषत: अनुसूचित जाती आणि दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा झाली. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती अतुल सावे यांनी यावेळी सादर केली. त्यांनी राज्यातील सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या योजनांमुळे समाजातील मागासवर्गीय आणि दिव्यांग बांधवांच्या जीवनात आलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला.
(हेही वाचा – Saudi Arabia ची भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी; Muslim नागरिकांची इस्लामी राष्ट्राकडूनच गोची )
या परिषदेचे (Conference) उद्दिष्ट सामाजिक समावेशकता आणि सक्षमीकरणाला चालना देणे हे आहे. यासाठी देशभरातील राज्य सरकारांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करणे आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन धोरणे आखणे यावर भर देण्यात आला. परिषदेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यातील आव्हाने आणि यशस्वी उपाययोजनांवर चर्चा केली. ही परिषद सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community