गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही. नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात त्यांची कायदेशीर चौकशी सुरू आहे; म्हणून काँग्रेसने (Congress) या बालिश निषेधांमध्ये सहभागी होऊन स्वतःलाच फसवू नये. (National Herald Case) संपूर्ण देशाला माहिती आहे की, या संदर्भातील प्रकरणाचा तपास १ नोव्हेंबर २०१२ रोजी सुरू झाला होता. त्या वेळेस काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार सत्तेत होते. अशा परिस्थितीत, काँग्रेस तपासाचा दोष भाजपावर टाकून जनतेची दिशाभूल करू शकत नाही, अशी टीका विनोद तावडे यांनी केली.
(हेही वाचा – Shiv Chhatrapati Awards : ऋतुराज गायकवाड, शकुंतला खटावकर यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार)
नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी ९ एप्रिल रोजी दाखल आरोपपत्रातील महत्त्वाच्या मुद्यांची पडताळणी करून सुनावणी २५ एप्रिल रोजी निश्चित केली. आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे.
काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला भाजपाकडूनही उत्तर दिले जात आहे. यानंतर आता भाजपा नेते विनोद तावडे यांनी एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेसवर पलटवार केला आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडलेले असतानाच जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. हरियाणामधील शिकोपूर जमीन व्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी केली जात आहे. (National Herald Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community