राहुल गांधी ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नाहीत! ‘तो मी नव्हेच’ भूमिकेत

154
‘नॅशनल हेराल्ड’च्या घोटाळ्याविषयी सध्या ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ईडीने राहुल गांधी यांची चौकशी केली. मात्र या चौकशीच्या दरम्यान राहुल गांधी हे ईडीला सहकार्य करत नाहीत, असे समोर आले आहेत, ईडीच्या प्रत्येक प्रश्नाला ‘तो मी नव्हेच’, या भूमिकेत राहत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकारी गोंधळात पडले आहेत.

एकही पैसा घेतला नसल्याचा दावा 

‘नॅशनल हेराल्ड’ची मूळ कंपनी ‘असोसिएट जर्नल’ आणि ‘यंग इंडियन’ कंपनीतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीकडून राहुल गांधींची चौकशी सुरु आहे. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियनच्या मालकीचे आहे. ‘असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ कंपनीला कर्जमुक्त करण्यासाठी ‘यंग इंडियन’ कंपनी स्थापन करून ९० कोटी देण्यात आले. हे ९० कोटी काँग्रेसने ‘यंग इंडियन’ला दिले होते. यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार २०१३ मध्ये भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. या प्रकरणात राहुल व सोनिया गांधी यांना जामीन मिळाला आहे. राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना यंग इंडियन ही नफा न मिळवणारी कंपनी असून कंपनी कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी या कंपनीतून एकही पैसा घेतला नसल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.